[ ४६४ ]
श्री.
पौ छ १ रमजान
राजश्री दामाजीपंत हिंगणें गोसावी यासी:-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। पिलाजी जाधवराऊ दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. बंगाल्यास स्वारी जाली ते समयीं, राजे ईश्वरसिंग यांणीं आह्मांस मेजवानी रुपये ५००० पाच हजार तुह्माबराबरी पाठविले आहेत, ह्मणोन आयामल्ल याणीं लेहून पाठविलें होतें. त्याचे दस्ताऐवज बजिन्नस आह्मांपाशीं आहेत. तुह्मी पैका पाठवाल ह्मणोन इतके दिवस वाट पाहिली. परंतु तुह्मी स्मरणपूर्वक पैका पाठविला नाही. यास्तव हाली हें पत्र आपल्यास लिहिलें असे. तरी, सदर्हू ऐवज राजश्री आनंदराव गंगाधर मुनशी याजबराबरी आह्मांकडे रवाना केला पाहिजे. जाणिजे. छ १२ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद )
श्री ॅ
पांडुरंगचरणीं दृढभाव
चांगोजीमुत पिलाजी
जाधवराव