[ ४६३ ]
श्री
पौ। छ २९ शाबान.
राजश्री बापूजी माहादेव व राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशळ जाणऊन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. + + ईश्वरसिंग बाहेर निघालियानंतर + + + + चें वर्तमान मिथ्या वर्ता + + + + लागून चित्त + + + + + + + + + +
आमचेंही कुच होईल. + + वियासी बहुत गर्व होतो. परंतु खावंदाचा प्रताप थोर ! त्यांच्या प्रतापेंकरून हतगर्व केलें ! बहुत नम्र होऊन सलाह केली. या समयांत त्यांनी वाचून जावें ऐसें नवतें, परंतु राज्य थोर, प्राचीन ऐसें जाणून, आपलें कार्य करून घेऊन, सलूख केला. वरकड आह्मी सुखरूप खुशाल आहों, कांहीं चिंता नाहीं. सदैव पत्रें पाठवून मनसबा विस्तरें लिहात जाणे बहुत काय लिहिणें. हे विनंति.
( मोर्तबसुद ) *