[ ४५९ ]
श्री.
बाळाजी अवजीचे चिरंजीवाचा व्रतबंध, शके १५९५ साधारण नाम संवत्सरे, सन इहिदे सबैन अलफ.
ब्राह्मण यांनी ग्रामण्य घंगाळ लवंडिलें. मंत्रानुप्रचित मुलाची पाहून रजा दिली; सबब, शूद्रांस राज्याभिषेककारणें अभिमान धरून संमत काशीचे आणिले. नंतर गागाभट आले. त्यास संमत न देत ब्राह्मण तेव्हां चिटणिसासी तंटा केला. हा कलुश मनांत आणून कारभारी अनकूल जाले. मंत्रोपदेश करविला. नेम पूर्वी ठरला होता सा। चांद्र सेनीस न करणे. गागाभटजी लि॥, त्यास आणावयास गोविंदभट खेडकर पाठविले. निळा सोनदेव याची मुजूमी काढली. पुढें रघुनाथपंत चंदीहून आले. त्यांनी रदबदली करून वस्त्रें मुजुमीचीं दिल्हीं. शके १५९३ विरोधकृत संवत्सर. इसन्ने सबैन अलफ.
सुरत लुटिली. शके १५९४ परिधारी नाम. सन सलास सबैन अलफ
गागाभटास आणावयास भालचंद्रभट पुरोहित, सोमनाथभट कात्रे पा। शके १५९५ प्रमाथी. सन अर्बा सबैन अलफ.
राज्याभिषेक १५९६ आनंदनाम. सन खमस सबैन ज्येष्ठ शु॥ १३ स जाला.
यमाजीपंत १६७१ शुक्ल नाम सन खमसैन मया व अलफ, यांणी द्वेष उत्पन्न केला. आईसाहेबास मिळोन, गोविंदराव चिटणीस व पेशवे यांस कारभार करूं न देणें विचार. सबब पेशवे याजला कैद
करून कासाईचे किल्यावर ठेविलें. वर्षभर होते.
पेशव्यास राजधानी प्राप्त झाल्यावर, संपूर्ण ब्राह्मण मंडळी वेदविद्याधीत. क्षत्रिय चांद्रसेनीय लेखनविद्येंत प्रवीण उदरनिर्वाह करून ....ते; सबब बराबरीनें वागले. चांद्रसेनीय थोडे, ब्राह्मण फार, ह्मणून .....ष वाढला; परंतु कर्मलोप जाला नाही. आपाजी यशवंत, हिरवाडी ....... रायगड, पेणचा मामला सरकार अमलांत ब्राह्मणांनीं दंगा केला ह्मणून, सरकार हुकूम मार्गाचा सांगतां दुराग्रहार येऊन गैरसमजूत ......री बल्लाळ फडके यास समजाऊन ग्रामण्य केलें. .......हां, रामशास्त्री प्रभुणें माहुलीकर यास नाना फडणिसांनी चिठी ......, याचा शास्त्रार्थ कसा ? त्याचें उत्तर त्यांनी पाठविलें, ....... करण्यांनी फार मेले; यश आलें नाहीं; आपण या कजियांत पडूं नये. तेव्हां याची प्रचीत पाहणें, हरीपंता बोलोन शके १७०९ .....वंग संवत्सर, सन समान समानीन मया व अलफ, उत्पन्न केलें. ......स्त्री वर्तमान तावत्काल ग्रामण्य जालें नाहीं; बंद होतें. नंतर शके .....७११ कार्तिक शु॥ ३, रामशास्त्री वारले. आपाशास्त्री अधिकारी .....ले न्यायाधीशींत. तेव्हां सनदा पाठवून कर्दबंद केले. अग्रहास ......रीपंत पडले. आपाशास्त्री यास आरोप आणिला. त्यांणी संन्यास ......ला, शके १७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥ ७, नंतर माघ .......सीं मोगलांवर श्रीमंताची स्वारीची तयारी जाली. खर्ड्यावर फते ......ली. आश्विन शु॥ १२ श्रीमंतांनी उडी टाकली. पुढें चिटणीस, नीलकंठराव, व रावजी आपाजी, यांणी, बाजीराव प्रधान यांची रजा .......ऊन, पत्रें सरकारचीं माहालोमाहालीं घेऊन कर्म मोकळें ......लें. त्या शास्त्र्यांत पंडीत त्यांची नांवें :--
बाळशास्त्री टोकेकर. १ रामचंद्र दिक्षित बाम. १ बाळशास्त्री चंदावरकर.
नृसिंहशास्त्री गुर्जर. १ त्रिंबकशास्त्री. १ त्रिमलाचार्य परशुराम शास्त्री. १ सूर्यनारायणशास्त्री.
------
८
यांणी सनदा चांद्रसेनीस शके १७१९ पिंगलनाम संवत्सरे समान तिसैन मया व अलफ वैशाखमासीं. पुढें आपाशास्त्री काशीस गेले. काशीकरांनी पत्र पा।, त्याचें उत्तर इकडून गेलें. पुढें शके १७३९ इंग्रजी जाली.