[ ४४२ ]
श्री शके १७२२ पौष शुद्ध १.
श्री ०
जीवाजी प्रभु पुत्रस्य
रामरायस्य धीमतः मुद्रा
सर्वगुणोपेता राजसम्रा-
ज वर्धिनी.
आज्ञापत्र राजश्री रामराव जिवाजी चिटनिवीस ता। मोकदमानि मौजे धामणेरें सां। कोरेगांव. सु॥ इहिदे मयातैन व अलफ. मौजे मजकूर दरोबस्त पा। चिरंजीव राजश्री रघुनाथराव याचा हिसा. त्यापैकी चिरंजीव राजश्री नारायणराव यास चौथाई वसूल देत जाणें. जाणजे. छ० २९ रजब. प॥ हुजूर.
लेखन
सीमा.