श्रीह्माळसाकांत
[ ४३८ ]
शके १७१६ मार्गशीर्ष वद्य १०
राजश्री देवराव महादेव गोसावी यांसः---
दंडवत विनंति उपरि. तुह्मी पत्र पाठविलें तें पाऊन लेखनार्थ अवगत जाहला. बुधवारचे मुहूर्ताचा निश्चय होऊन उत्तर यावें ह्मणोन लिहिलें व राजश्री दामोधर देवराव यांचे सांगितल्यावरून सविस्तरें कळलें. ऐसियासी, येविषईचें बोलणें राजश्री यशवंतराव गंगाधर यांसी होऊन रवानगी जाली आहे. याउपरि राजश्री बाळाजीपंत नाना यांचे विचारें निश्चय होऊन लेख येईल त्याप्रमाणें इकडून घडेल. वरकड सविस्तरें मशारनिले लिहितील. रा। छ २२ जा।वल सु॥ खमस तिसैन मया व अलफ. बहुत + काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद