[ ४३७ ]
श्री शके १७०६ श्रावण वद्य १२.
दस्तकमरकार राजेश्री पंतप्रधान ता। कमाविसदारान् व चौकीदारान् व बाजेलोकान् व मोकदमान देहाय व नावाडी ठोकरेकरी, सु॥ खमस सामनिन मया व अलफ. सरकारचा खिजमतगार माणकोजी कदम यास हुजुरून पुण्याहून का। नासीक येथें कामगारीस पाठविलें असे. तरी जातां येतां मार्गी कोन्हीं मुजाहिम न होणें. नदीनाले पार करणें. ज्या गांवीं राहतील तेथें चौकी पाहरा करीत जाणें. जाणिजे. छ २५ रमजान. आज्ञा प्रमाण. मोर्तब मुद.