[ ३९१ ]
शके १६८० भाद्रपद
हिशेबाप्रो। रुपयांत मुजरा देऊं. यावर राजश्री अंताजी माणकेश्वः याजकडोन श्रीमंत स्वामीच्या सरकारांत लाख रुपये देविले होते. त्यासी वायदा होऊन चुकला. श्रीमंत स्वामींनीं अंताजीपंतास तगादा केला त्यांनी आह्मांस केला. त्यासी, आह्मीं विचार केला होता कीं, बाळाजी सामराज याजपासून लाख रुपये घेऊन वारावे. त्यासी, बाळाजीपंत कनोजी प्रांतीं आहेत; त्यांचे पुत्र नारोपंत; त्यांचा हिया होईना. बाळाजीपंतांस एकदोन पत्रे पा।, परंतु त्यांणीं टाळाटाळ केली. येथें कर्ज मिळेना ! आणि व्याजही देवेना ! जरूर संकट जाणून राजश्री अंताजीपंतीं श्रीमंत स्वामीसच आह्माकडोन लक्ष रुपये देविले. खाविंदांनी कृपा करून मान्य केले. त्यासी श्रीमंत स्वामींनी लक्षा रुपयाची वरात तुह्मावर राजश्री गंगाधर बाजीरायाच्या पथकाची केली आहे. मिती श्रावण वद्य १३ त्रयोदशीस रु॥ मितीची केली आहे. त्यासी, वरातेबरोबर आह्मीही आपलें पत्र तुह्मास दिधलें आहे. त्यासी, वरात व आमचें पत्र आलि-(या)-वर सकारून रुपये देणें. रुपये द्यावयाच्या तजविजीसाठीं हें आलाहिदा पत्र लिहिलें असे. त्यासी, राजश्री यादोपंत व तुह्मी एकत्र होऊन, वस्तभाव मोडून, रुपयाचा सरंजाम करून, रुपयाच्या संरंजामास तुह्मांस आठ च्यार दिवस लागतील. यास्तव राजश्री धोंडाजीनाईकी पत्र रघुनाथनाइकास लिहिलें आहे; ते रुपयाची सरंजामी करून देतील. हरएक उपायेंकरून त्या वरातेचे रुपये देऊन कबज घेऊन आह्मांकडे पा। देणें. रुपयाच्या सरंजामानिमित्तें राजश्री हरबाजीनाइकांसही पत्र लिहिलें आहे. धोंडाजीनाइकीं श्रीमंत स्वामी पुण्यास आहेत, त्यांची ममता आपल्याकडे कैसी आहे ? हें हृद्गगत वर्तमान मनास आणून आह्मांस वरचेवर लिहीत जाणें. यानंतर राजश्री यादोपंतांस सांगून गुजरातचा हिशेब वरशाचा वरशास व्याज, मुद्दल, व मुशारा, ऐसा एकत्र करून तयार करून ठेवणें. व्याज चकरवाडीचें करून ठेवणें. त्याचे दस्ताऐवज व संदा लावून ठेवणें. *