[ ३८९ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी महादेव गोसावी यांसिः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्मांकडे सरकारचा ऐवज करार केला आहे. त्यापैकी राजश्री अंताजी माणकेश्वर यांनी एक लाख रुपयांचा हवाला घेऊन श्रावणअखेर द्यावयाचा करार केला. ते हालीं मा।रनिलेनीं तुह्मांकडून देविले आहेत. तेबा। देणें, पथक दिंमत गंगाधर बाजीराव यास रुपये १००००० एक लक्ष रुपये देविले असते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस पावते करून पावल्याचें कबज घेणें. रा। छ २ जिल्हेज. सु॥ तिसा खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? लेखन सीमा.