[ ३८८ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध १.
सहस्रायु चिरंजीव राजश्री तात्या यासीः--
प्रति बापूजी माहादेव कृतानेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। २९ जिल्काद जाणून तुह्मी आपलें क्षेम लिहित जाणें. विशेष. तुह्मी झाशीहून मातुश्री सहवर्तमान स्वार झालियावर नाशकास पोहचलियाचें वर्तमान कांहीं कळत नाहीं. श्रीमंत स्वामीचे पांचलक्ष रुपये देणें. त्यासी रा। माणकोपंतास समागमें घेऊन गेलात. त्याशी, झाशीमधें व नाशकांत त्यासी काय रुपये दिधले ? त्याची निशा कोणें प्रों। केली ! हे कळत नाही. कारण कीं, त्याचाहि वायदा चुकोन गलो. येथें दीक्षित तागा करितात, यास्तव, सविस्तर वर्तमान लिहिणें. यानंतरः-- मौजे चांदोरीची जप्ती उठोन गांव बाळजोशाचे स्वाधीन केला किंवा नाहीं ? राजश्री बाळाजीपंत मांडोगणे नाशीक येथील घराच्या जप्तीस आले होते. त्यासी, घरांतून काय काय वस्ता घेऊन गेले, हें तपशीलवार लिहून पा। कीं, श्रीमंत राजश्री दादासाहेबांसमागमें आहे. श्रीमंतांनी आज्ञा केली आहे कीं, पुण्यास गेलियावरहि निमितें कीं श्रीमंत स्वामीचे भेटीस येतो. हे रुपये मुजरा घ्यावे लागतात. श्रीमंत स्वामीस सा लक्ष रुपये साहुकाराचे काढून दिधले. त्यासी, साहुकारास हरएक उपायेंकरून द्यावे लागतात. दीक्षिताना घरें, वस्तभाव, लेहून घेतलीं हें सर्व तुह्मांस विदितच आहे. पुढें आह्मीं दरबारास येतों. श्रीमंत स्वामींनी कृपा करून कामाकाजाचा बंदोबस्त करून देतील ह्मणजे त्यासी सुराखुरा होऊं. चिरंजीव राजश्री नाना शिंद्याच्या लष्करांत आहेत. चिरंजीव गणपतराऊ व राजश्री त्रिंबकपंत दिल्लीस पाठविले आहेत. त्यांचेंहि पत्रें आली. सुखरूप आहेत. स्वामीचें वोझें डोईवर आहे तोपरियंत खर्च बहुत विचारानें करणें. जोपरियंत त्यांची कृपा होऊन कामकाजाचा बंदोबस्त होय तोपरियंत प्राप्ततीचा विचार नाहीं, आणि साहुकाराचा पैसा देणें, असें संकट आहे. तुह्मांसहि सर्व विदितच आहे; परंतु सुचनार्थ लिहिलें आहे. हरएक तजवीज करून लाख रुपये देऊन कबज घेणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. पौ। छ २३ जिल्हेज.