[ ३८७ ]
श्री शके १६८० श्रावण शुद्ध १.
पौ छ २२ माहे जिल्हेज.
राजश्रियाविराजित राजश्री यादो रंगनाथ स्वामी गोसावी यासीः--
सो। बापूजी महादेव नमस्कार विनंति उपरि येथील कुशळ छ २९ जिल्काद जाणून तुह्मी आपलें कुशळ लिहीत जाणें. विशेष. मातुश्री व चिरंजीव तात्या त्या प्रांतास आले, त्यांणी वर्तमान निवेदन केलेंच असेल. यावर, बहुत दिवस जाले ; तुमचें पत्र येऊन वर्तमान न लिहिलें; तर तेथील सविस्तर वर्तमान लिहिणें. श्रीमंत स्वामीस सा लक्ष रुपये देणें लागले. त्यापैकीं अंताजी माणकेस्वरांनी लक्ष रुपयांचा हवाला घेतला. चिंतामण दीक्षित यांनी पाचा लक्षांचा घेतला. दीक्षितांच्या तर्फेनें माणकोपंत आले होते, त्यांचा निकाल कैसा केला, त्यांच्या पदरीं वस्ता काय मोडून घातल्या हें तपसीलवार लिहून पा।. हली, अंताजी माणकेस्वराच्या लक्षा रुपयांच्या हवाल्या बाबद वरात, श्रीमंत स्वामींनी गंगाधर बाजीरायाच्या पथकाची केली आहे. त्यासी, तात्या, तुह्मी, एकत्र होऊन वस्तभाव मोडून त्यांच्या पदरीं ऐवज घालणें. दीक्षितांचे लाख पन्नास हजार बाकी राहिले, तर आह्मी येऊन निकाल करून देऊं. सारांष गोष्ट, सा लक्षा रुपयांचा साहुकारांचा निकाल करून दिधला पाहिजे. गुजरातच्या हिसेबाचा मजकूर तात्याच्या पत्रीं लिहिला आहे, त्याप्रों। व्याजमुद्दल वरशाच्या वरशास चकरवाडीचा हिसेब तय करून ठेवणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
गिरधर व लक्ष्मण यास आशीर्वाद.
राजश्री बंदूजी सुतार यास आशीर्वाद.