[ ३४६ ]
श्रीवरद शके १६७७ पौष शुद्ध १०.
राजश्री यशवंतराउ गोसावी यांसिः--
उपरि. तुळाराम व साहेब रायवाणी यांच्या मामलतीपैकी गुलाम मुस्तफाखां याचे तलवे पो। रु॥ २३०० तेवीसें तुह्माकडून देविले असेत. तर सदरहू रुपयांपैकी दोन रु॥ दाहा आणें कसूर वजा करून रु॥ देऊन कबज घेणें. जाणिजे. रा॥ छ ९ माहे रबिलाखर, सु॥ खमसैन मया अलफ. बहुत काय लिहिणें ?
मोर्तब
सुद
* बार