[ ३४४ ]
श्रीवरद शके १६७७ आश्विन वद्य ७.
राजश्रियाविराजित राजश्री बाबूराऊ गोपाळ गोसावी यांसिः--
सेवक पुरुषोत्तम महादेव व देवराऊ महादेव नमस्कार उपरी येथील कुशल जाणून स्वकुशल लिहिणें. विशेष प्रा। सरावा व ता। भोजपूर वगैरेची कमाविश सालगु॥ तुह्मांस सांगितली होती. तेथला हिशेब कितेब भरून पावलों. कांहीं लांझ्या हिशेबाचा राहिला नाहीं. रा। छ २० माहे मोहरम, सु॥ सित खमसैन मया अलफ. सन ११६३. बहुत काय लिहिणें ?