[ ३४१ ]
श्रीमोरया शके १६७७ ज्येष्ठ शुद्ध २.
श्रियाविराजित राजश्री बापूजी व राजश्री दामोदरजी स्वामीचे सेवेसीं :-
सेवक गंगाधर यशवंत व रामाजी यादव सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. इकडील वृत्त राजश्री सुबेदारानीं लि॥ आहे त्यावरोन कळो येईल. मुख्य गोष्टी राजश्री सुभेदार यशस्वी. खावंदाच्या प्रतापें अमित्र हतवीर्य करोन, कार्यभाग संपादून, बहुत यश संपादलें. रजपूत बहुत मत्त होते. परंतु बहुत थंडे जाले. हुरूप त्याजमध्यें राहिला नाहीं. सदैव पत्र पाठऊन परामृष करीत जाणें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
पै॥ छ ३० साबान.