[ ३३९ ]
श्री शके १६७७ अधिक ज्येष्ठ शुद्ध ९.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी माहादेव व दामोधर महादेव स्वामी गोसावी यांसिः--
पोष्य रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मी सरकार कामें करावी, इतबार, वाढऊन घ्यावा, तो न घेतां इतबार गमाविला. त्याची कलमें :--
बंगाल्यास सरकारच्या पैकियाचा यादी तुह्माजवळ दिल्ह्या होत्या. त्या
तनखा जाहला. तो आणावयास यादीप्रों। कामें गया वगैरे करून
राघो नीळकंठ यास पाठविलें. पाठवावीं ते अद्यापि कांहीं नाहीं. हें
त्यास, राघो नीळकंठ यांणीं पुढें एक अंतर.
पत्रें पाठविली होती. त्यांचें
उत्तर बंगालियाचे सुभियाचें
आलें कीं, दोन तीन पत्रें हुजूरचीं
आलीं की, पैका हुजूर पाठवणें, खासा स्वारी देशी येतेसमयीं रुबरु
त्याजवरूनं हुजूर रवाना केला, करार केला कीं, दो महिन्यानें
त्यास पैका पावणें तो हुजूरचे मागून दर्शनास येतों. त्यास अद्यापि
मुतसद्दियांचे विद्यमानें वकिला- येत नाहीं. हे बेकैदेची गोष्ट.
जवळ पावेल, तुह्मी न येणें,
माघारें जाणें. त्या पत्राचा मजकूर
येथें लिहिला आला. याजवरून रामचंद्र लक्षुमण याच्या बराता
दिसणियांत आलें की परभारें केल्या असतां रुपये न दिल्हे. त्याचा
पैका राघो नीलकंठ याजपासीं गुमास्ताही उठवून लाविला. याप्रों।
न द्यावा. तेथें जाऊन तुह्मांपाशीं केलें.
घ्यावा. हे गोष्ट तुमच्या केल्याचीच
आहे. हे सरकारचे मर्जीस अंतर
असे.
येणेंप्रो। च्यार कलमें केलींत. यांत एकाही ठाईं येथील लक्ष राखून न वर्तला. यामुळें तुमचे प्रामाणिकपणाची व सचोटी शर्त जाहली ! तुह्मी हींच कामें करीत आला. तेव्हां याची चिंता कशास कराल ? परंतु तुह्मासी बोलणियांत आलें की निष्ठेनें वर्तल्यास तुमचें कल्याण करूं. त्यास, निष्ठेचा प्रकार तो हो जाहला ! याउपरि येथील वचन बोलणियांत आलें तें उगवलें. गुंता कांहीं राहिला नाहीं. तुह्मी जैसी वर्तणूक कराल तैसें फल पावाल ! जाणिजे. छ. ७ साबान. बंगालियाचे रुपयास अडथळा केला हे गोष्ट आपले स्वरुपास हानिकारक केली. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
पै॥ छ. २९ रमजान.