[ ३३८ ]
श्री
शके १६७७ चैत्र वद्य ६.
राजश्री चिमणराजा संस्थान पेठ गोसावी यांसीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
रघुनाथ बाजीराव आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. राजश्री दामोधर माहादेव यांचे हवेलीचे कामाची लांकडे ननासी महाजे येथून गठडे सुमार १०० संभर भरोन नासिकास आणितील. त्यास दस्तकाप्रमाणें आणूं देणें. जकातीचा तगादा न लागे तें करणें. जाणिजे. छ. १९ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें.
श्री
लेखन
सीमा
राजा शाहू नरप-
ति हर्षनिधान
बाळाजी बाजीरा-
व प्रधान.