[ २४९ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य १४.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री देवराव महादेव गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. मामलतीचा मजकूर कितेक विस्तारें लिहिला तो सविस्तर विदित जाहला. ऐसियास, चिरंजीव राजश्री दादा येतील तेव्हां तुह्मीही येणें. तदोत्तर जें सांगणें तें सांगितलें जाईल. आपलें समाधान असों देणें. जाणिजे. छ. २७ जमादिलावल. सु॥ इसन्ने खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
लेखनसीमा.