[ २४६ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य ९.
श्री
राजा शाहू
नरपति हर्षनि-
धान बाळाजी बाजी-
राव प्रधान.
राजश्री दामोदर महादेव व राजश्री पुरुषोत्तम महादेव गोसावी यांसि:-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो.
मलारजी होळकर व जयाजी सिंदे दंडवत विनंती सु॥ ईसन्ने खमसैन मया अलफ. नवाब अहमदखान बंगस याच्या वाटणीस परगणे बीलराम दिल्हा असे. परगणे मजकुरांस अमील त्याचे तरफेनें येईल. त्यास अमल देऊन तुह्मी उठोन येणें. छ २२ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
लेखनसीमा.