[ २४५ ]
श्री शके १६७४ चैत्र वद्य ४.
राजश्री कोंडो निलकंठ सुभेदार दिमत सरदेशमुखी पा। जावळी व्याघ्रगड गोसावी यांसि :-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।. हैबतराव केसरकर अजाहत सरदेशमुख रामराम. सु॥ इसनें खमसैन मया अलफ. तुह्मांकडे हप्त्याचा ऐवज फालगुण मासपर्यंत येणें आहे. तो अद्याप पाठविला नाही. तरी हालीं ऐवज आणविला असे. तरी सिताबी पाठवून देणें. वांसे सुमार ५०० पांचशें, व सर २५ पंचवीस, व कणसें १० दहा, व पानभारे १०० शंभर, ऐशी वळवण, शाखेस आंबे पाहिजेत. तरी आंबे पाठवून देणें. व चिंचाही रवाना करून देणें. या कामासी जोती जासूद, जथें नरोजी नाईक पा।, यासि मसाला रुपये दोन देणें. रा। छ ० १७ माहे जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
लेखना
वधि
स्वस्ति श्री सुखदामुद्राप्रतापो-
त्कर्षवर्धिनी सरदेशमुखस्यैषा
रामराजस्य राजते.