[ २४४ ]
श्री शके १६७४ चैत्र शुद्ध २.
तिर्थस्वरूप राजश्री दादासाहेब वडिलांचे सेवेसी :--
बालकें दिवाकरानें चरणांवर मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार. विनंति. येथील क्षेम तागाईत छ रबिलाखर मुक्काम इंद्रप्रस्त वडिलाचें आशीर्वादेंकरून यथास्थित असे. यानंतर :- नवें वर्तमान, गांवाचा कजिया जाला होता, व अंताजीपंताची ठाणीं उठविलीं होती, तें सर्व वर्तमान पहिले सेवेसीं लिहिलें आहे, त्याजवरून कळलें असेल. आतां नवें वर्तमान जालें: छ १२ वें, राजश्री अंताजी माणकेश्वर आपले येथें आले होते. तीर्थस्वरूप बापू साहेबांसी वचन प्रमाण जालें. अंताजीपंतांनी सांगितले; जें तुह्मी सांगाल तें आह्मांस प्रमाणे आहे. ऐसें वचन प्रमाण बापूसी जालें. अंताजीपंत उठून घरास गेले. बापू पायीं बागांत जातांच अंताजीपंतास रुका पाठविला जे :--
रा॥ त्रिंबोपंत सुबेदारास दूर करणें व कल्याणसिंगास दूर कराल तर * तुमचें आमचें इष्टत्व जा.... .... .... इष्टत्व नाहीं.... .... वर्षां आहेत, तुह्मांसी गरज आहे, माझ्या घरचा कारभार यासी गरज काय ? ऐसें साफ उत्तर दिल्हें, व सांगितलें जें:– येथे इतकी लढाई जाली; माझे चारसे घो(डे) पडले, त्यांत एक दाहा घोडी आणखी पडलीं ऐसे जाणे ; नाहीं तर, माझी सोहाळची सराई घेतली आहे ती सोडून देणें. ऐसे साफ उत्तर दिल्हें. सेवेसी श्रुत होय. व आज शंकरचा रुका आला होता जेः- दोन हजार रुपये खर्चास पाठवणें. त्याजवरून तीर्थस्वरूप बापूसाहेबीं आज्ञा केली जेः-- हजार रुपये तर्ही पाठवणें. त्याजवरून म्यां विनंती केली जे, रुपये कोठून घ्यावे ? मग आज्ञा केली जे, दाजीरायाबाबत रुपये आहेत त्यांतून घेणें. मग म्यां विनंती केली की, खर्चावयास तितकेच रुपये आहेत. तर आज्ञा केली जे, त्याजकरितां इतके खर्च जाले. त्यांत हे एक हजार रुपये जाणावे. ऐसें ह्मणतात. सेवसी श्रुत होय. गिरदचे फौजदारीच्या नकला पाठविल्या आहेत. ह्या तगलिफी पहिल्यानें माझेपासी पाठविल्या होत्या की तेथें पाठवणें. त्या म्यां दोन ........ त्म्या होत्या; आतां बजिन्नस सेवेसी पाठवि............त