[ २४२ ]
श्री.
शके १६७३.
राजश्री सखो माहादेव स्वामीस :-
विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पाऊन संतोष जाहाला. तुमचा समज आजच असा आहे असें नाहीं; पूर्वीपासून आहे. वरकड जें करितां ते बरेंच. त्याचा विषय फार थोडा. परंतु मातुश्री बोलवीत नाहींत, कामकाज सांगत नाही, हें लिहिलें, हें तरी फारच चांगलें. असें यामागें कधीं जाहालें नाहीं. मुख्य, मातुश्रीचे आज्ञेप्रमाणें वर्तणुक करावी; त्यांचे मर्जीस विरुध न पडे, असें असावें; तें तुह्मीं आज लिहिलेवरून कळलें. याउपर काय ह्मणावें ? खर्चवेंच जसा मातुश्री आज्ञा करितील तो करावा. भिडेनें मातुश्रीस एखादा घालतो, आपण समजून सांगावें. आज्ञेप्रों। वर्तणूक करावी. मातुश्रीस संवसार अगर सर्वत्र विषय कळतो. तो तुह्मांस कळावयासी बहुत जन्म पाहिजेत ! सारांउष, मातुश्रीची आज्ञेचा प्रकार, अगर मातुश्रीनीं खर्चवेंच केला तरी उत्तम आहे. ते जें करितात तें समजून करितात. तुह्मांस मात्र समजत नाहीं, इतकाच अर्थ. जसें मातुश्री सांगतील तसें करीत जाणें, ह्मणजे लक्षजोड आह्मांस तुह्मीं दिल्ही ! वरकड संवसार तुह्मीं आपले तर्फेनें अधिक उणें समजोन करणें, हें आह्मांसच धारजिणें नाहीं ; तुह्मांस तरी हें प्राप्त कसें असावें ? तें श्रुत नाहीं. जें चालतें तें बरेंच आहे. मातुश्री बोलावीत नाहीं. हे मात्र सर्वार्थी वाईट समजून, त्यांचे आज्ञेचा अर्थ समजोन, वर्तणूक करणें. वरकड समजलें आहे. हे विनंति.