श्री शके १६७३ भाद्रपद वद्य ५.
राजेश्री गोविंद तमाजी गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्त्रो। जयाजी सिंदे दंडवत सुहुरसन इसन्ने खमसैन मया अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर वर्तमान कळों आलें. रामसिंगाचा व बखतसिंगाचा कलह लागली आहे. सर्व रजपूत बखतसिंगा मिळोन रामसिंगा खारज केलें, ह्मणोन लेखन केलें. तर जें लिहिणें तें राजश्री पुरुषोत्तम महादेव लिहितील त्यावरून कळो येईल. जाणिजे. रा। छ १९ सवाल. बहुत काय लिहिणे ? हे विनंति.
श्री
मोर्तब
सुद.
श्री जोति
लिंगचरणीं तत्पर
राणोजीसुत ज-
याजी सिंदे
निरंतर.