॥ श्री ॥ शके १६७० श्रावण वद्य १३
+ + + + + दिनचर्येचें वर्तमान सविस्तर लिहावें ह्मणून लिहिलें. ऐशास, राजश्री गंगाधरपंत फौजेसहित पुढें पाठविले होते. कछवियाची हि फौज बाहेर चालून आली. दोही फौजेचा मुकाबला होऊन युद्ध जालें; व रजपूत सिकंदे वरून जैपुरापाशी नेऊन घातले. त्याउपरि राजे ईश्वरसिंग तमाम फौजेसुद्धां बाहेर निघाले आह्मीं हि तयार होऊन गेलों. त्यांचा आमचा मुकाबला होऊन, चार घटका युद्ध जालें. सेखावते व नरोके जाट मोडून ताराज केले. राजियाच्या हत्तीपावेतों मारीत आपले लोक गेले. रजपूत बहुत सिकंदे केले. रोज कोसभर चालूं पावलें नाहींत. त्यांच्या लष्करांत दाणा, वैरण, फाटीं बहुत दुर्भिक्ष. साधे रोजीं मौजे बागरास येऊन त्यांचा मुकाम जाला. तेथें बेहिमत कछवे बहुत जाले. संकट त्यांनी जाणून, रा॥ केशोदास सलुखाबद्दल आह्माकडे पाठवून, रदबदल करून, बुंदी सोडून देतो, माधोसिंगाचे चारी परगणे अगदी खाली करून निखालस देतों, ऐसा करार कबूल केला. तेव्हां आजी श्रावण + + द्वादशीस राजे ईश्वरसिंग या + + + + + + + + *