॥ श्री ॥
शके १६७० वैशाख वद्य १
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेंष. प्रं॥ ग्वालेर येथील फौजदारी बाबत सन सबाचा इजार रुपये १००००० एक लक्ष राजश्री बापूजी महादेव याजकडे दिल्लीस राजश्री विठल शिवदेव व राजश्री अंताजी माणकेश्वर यांणीं द्यावे ते हल्ली तुह्मांकडून देविले असते. तरी राजश्री सवाई ईश्वरासिंग याजकडील मेजावानीपैकीं एक लक्ष रुपये आश्विन शुद्र प्रतीपदेस सन तिसा अर्बैनांत देविले ते देणें. जाणिजे. छ १५ जमादिलावल, सु॥ समान अर्बैन मया व * अलफ, बहुत काय लिहिणें ?
(लेखन सीमा )