पुरंदरे ३३ ॥ श्री ॥ १६६९
राजमान्य राजश्री त्रिंबकराव सोमवंशी सरलष्कर यासी आज्ञा केली ऐसीजेः-
तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. वसंतगड यातील प्यादे यास कौल देऊन बाहेर काढले, गाव घेतला, ह्मणून लिहिलें तें विदित जालें. प्यादे यांस कौल देऊन काढावयाचे नव्हते. कापून काढले असतें तरी पुढें दहशत पडती. ती गोष्ट न केली ! बरें ! जालें तें जालें ! पुढें दहशत पडोन स्वामिकार्य सिद्धीस पावें ते गोष्टी करणें. पुढील कर्तव्यविचार सर्वांचे विचारें करून, राहिलीं स्थलें हस्तगत होऊन, उदाजीचा निःपात होय ते गोष्ट करणें. जेणेंकडोन स्वामिकार्य होऊन तुमचा नक्ष होय, स्वामी तुह्मांवर संतोषी होत, ते गोष्ट करणे. * सुदन असा.