॥ श्री ॥
शके १६६७ फाल्गुन शुद्ध ११
राजश्रियाविराजितराजमान्य
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः---
सेवक बाळाजीबाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्माकडे सरकार ग्वालियेर स्व॥ राजश्री जयाजी शिंदे वगैरे ऐवज येणें. त्यापैकी ई॥ छ १९ जिल्हेजापासून पंधरा दिवसांचे आलीकडे रुपये पन्नास हजार तुह्मी द्यावे. त्यांपैकी पेशजी हरबाजी महादेव याजवर हुंडी चाळीस हजार रुपयांची शहरची पाठविली. बाकी रुपये दाहा हजार राहिले ते राजश्री रामचंद्र हरी याजकडे देविले होते. त्यास, तुह्मी ऐवज दिल्हा नाहीं, वरात माघारी टाकिली. ऐशास, तुह्मी क्षेपनिक्षेप हवाला घेतला असतां वरात माघारी टाकून रुपये न द्यावे हे कोण गोष्ट ! हाली हे पत्र तुह्मास सादर असे. तरी सदरहु दाहा हजार रुपये १०००० हुंडी सातारियाचे साहुकारावर अथवा पुण्याचे साहुकारावर करून पाठवून देणे. पत्र पावतांच सत्वर हुंडी पाठवणे. विलंब न लावणे. जाणिजे. र॥ छ १० सफर, सु॥ सित आर्बैन मया व अलफ, बहुत काय लिहिणें.
( लेखन सीमा. )
पै॥ छ २३ सफर.