॥ श्री ॥
शके १६६७ माघवद्य ७
रजिश्रियांविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव गो॥ यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्माकडे सरकारचा गवालियेरचे हवाल्याबाबत ऐवज येणें. त्यापैकीं औरंगाबादेची हुंडी हरबाजी महादेव यांवरची रुपये ४०००० चाळीस हजारांची पाठविली ते पावली. सदरहू हुंडी औरंगाबादेस रवाना केली असे. हुंडीचे रुपये सरकारांत पावले ह्मणजे जमा जाहालियाचा जाब तुह्मास होईल. त्याप्रमाणें मजुरा असते. दिल्लीस न्यावयास तुह्मांसमागमें सिरपेंच दिले होते त्यापैकीं मोत्यांची जोडी १ एक पाठविली ते पावली. तुह्मी छ १९ जिल्हेजापासून पंधरादिवसा अलीकडे सरकारांत पनास हजार रुपये द्यावयाचा करार केला. त्यापैकी सदरहू चाळीस हजार रुपयांची हुंडी आली. बाकी दाहा हजार रुपये राहिले ते पत्रदर्शनीं पाठवून देणें. मुदत होऊन गेली. यास्तव एक घडी विलंब न लावितां सत्वर सदरहू रुपये पाठविणें. जाणिजे. छ २० मोहरम, सु॥ सीत अर्बैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?
( लेखन सीमा. )