॥ श्री ॥
शके १६६६ आश्विन वद्य १२
पै॥ कार्तिक वद्य ३०
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री यादोपंत गोसावी यांसीः--
से॥ बापुजी महादेव दामोधर महादेव नमस्कार उपरी येथील कुशल ता। छ २५ रमजान मु॥ इंद्रप्रस्थ जाणुन स्वक्षेम लिहिणें. विशेष. तुह्मी पूर्वी पत्र पा॥ पावलें. वर्तमान विदीत जालें. मार्गाचा हिशोब पा। तो पावला. वरकड सविस्तर चिरंजीव पुरुषोत्तमजीचे पत्रीं लिहिलें त्यावरून कळलें. तुह्मी आपलें कामकाज घरचें बहुत शाहाणपणें करीत जाणें. तुह्मांकरितां आह्मीं बेफिकीर आहों. श्रीमंताचा जिनस तुह्मांस लिहिले होते की राजश्री बाळाजी शामराज येतील ते घेऊन जातील. त्यावरून तुह्मी राहिलेस. बाळाजीपंतासही गुतां ग्वालेरीचे कामकाजाचा पडला. बरें ! आतां आह्मीच येणार आहों. न कळे, श्रीमंत तेथून स्वार जाले, गांठ कोणें ठिकाणीं पडेल. त्यांच्या समयास जिनस पावता तर उत्तम होते. आतां ते गोष्ट राहिली. जैसे होईल तैसे पाहातों. तेथे लोकांकडे गुतां दिंडोरकर देशमुख व दादो उद्धव यांजकडे रु॥ आहेत ते मागून घेणें. रोखे पत्रमनास आणून ज्यांपासी तगादा असेल तो उगऊन घेणे. घरचा बंदोबस्त उत्तम प्रकारें राखणें. केवळ लेकरांचे भरंवसियावर न जाणें. * बहुत काय लिहिणें हे विनंती.
से॥ वेणाजी त्रिंबक स॥ नमस्कार विनंती उपरी. तुह्मी पत्र प॥ तें पावलें. सदैव पत्रीं सांभाल करीत जाणें. घरचा समाचार घेत जाणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंती.