[ १६६ ]
श्री. शके १६६५ मार्गशीर्ष शुद्ध १२.
पौ। छ. ३ रमजान.
राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. शाहापूर, अकबरपूर, व सिवली, व खेवराबरा, येथील जमीदार गढ्या बळकाऊन, नवाबाच्या लस्करांत येऊन मिळाले आहेत. त्यासी, त्यांणी रुजू होऊन, गढी खाली करून, अमल सुरळीत घ्यावा, ऐसें असोन, उठोन तेथें आले आहेत. त्यासी, येविसीं नवाबास लिहिलें आहे कीं, पा। मजकुरच्या जमीदारास ताकीद करून गढ्या खाली करून देत, आणि, रुजू राहोन सरकार काम बजावीत, तें करणें. गढिया खाली जाल्यावांचून अमल सुरळीत होत नाहीं. तरी तेथें जमीदार आहेत, त्यांजला जारे पोहचवून, आपले हातीं घेऊन, राजश्री लक्षम शंकर याजपासी पोहचवून देणें. येविसीं गई न करितां पा। मजकूरच्या जमीदारास सज्या पावून, गढ्या खाली करून येत, तें करणे. छ ११ साबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद )