[ १६४ ]
श्री. शके १६६४ आषाढ शुद्ध ११.
राजश्री बापूजी माहादेऊ गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। राणोजी शिंदे दंडवत विनंति उपर येथील कुशल ता। आषाढ शुद्ध ११ मु॥ पा। उज्जेनी जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाले. भदावरचा प्रांत दुसाला करून घेतला, ह्मणून लि॥ तें कळों आलें. एथील वर्तमान तरः- श्रीमंताची छावणी फौजासहवर्तमान यंदां माळवे प्रांतें जाली. वरकड वर्तमान यथास्थित असे. तुह्मीं पत्रें लिहिली ती श्रीमंताकडे पा।. तेथून जाबसाल जो लिहिणें तो तुह्मास लिहितील. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सुद.
पौ॥ छ. १ जमादिलाखर.
श्रीजोतिस्वरूप *
चरणींतत्पर जनकोजि सुत
राणोज सींदे नीरंतर