[ १६० ]
श्री. शके १६६४ पौष शुद्ध ११.
चिरंजीव राजश्री नाना यासी. प्रति बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक आशीवाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय, कुशल लिहित जाणें. विशेष. या प्रांतीं प्राचीन हिंदुराजे सर्व संस्कृतप्रवीण. वेश्यामद्यादिकांचा अतिअनादर, साता पिढ्यांचे श्रीमत् सातां, नृत्यगीतवाद्यव्युत्पत्तिप्रवीण, स्वजातीय अनेक स्त्रिया प्रवीण ; त्यांसीं रत; किंचित् जितेंद्रियहि आहे ; नर्माची रीत ; देवाब्राह्मणाची विशेष मर्यादा व शोभा; जिचे अवलोकनमात्रें अधर्मिष्टास धर्मरती उत्पन्न होणार. गाणार कम्पतम स्वर, वर्जावर्जादिक शास्त्रप्रमाणरीतीनें गाणार; वेदशास्त्र किंचित् जाणतात; त्यांत जे मुख्य ते तो पाहिलेच नाहीत; जे मुख्य ते निरापेक्ष, सर्वर्धीसमृद्धि, त्याचे शिष्यवर्ग अनेक ; प्रयत्नें आणून विद्यादृष्टीनें पाहतां अतिश्रेष्ठ स्वदेशज; स्थूल दृष्टीनें पाहतां मात्र अरमणीय; बाग, फुलें, सरोवरे, कमळें, इत्यादि शोभा जे महाप्रयत्नें लहानशी करावी त्याची तो गणना नाहीं; :ज्याचें तेज पाहतांना असे वाटते की, यांची प्रार्थना करून स्वदेशास न्यावे; परंतु ते विदेशभूमी जाणून प्रार्थना केली असतां न येत; इकडील नद्या अमृतोपम बहुत जनास स्वजलप्रदानें समृद्धिवंत करितात, व पांथांस आनंद व राज्यास द्रव्यवृद्धि करितात; ज्यांचे सहचारें वोढ्याची उपमाही आमच्या राक्षसस्वभाव नद्यांस न ये; उतर प्रांतांतील सर्व मनुष्य शुभ्र, त्यांत एक रामचद्र व कृष्णजी शाम त्यांचे वर्णन करितात; देशीं एक ईश्वर श्रमयुक्त जाले ; इकडील सर्वही नीलांबुदसंभ्रम ; परंतु धर्मरूपें पाहतां जे हंसोपम ; सर्वहि मर्यादशील; आयापेक्षां व्यय थोडा; अथर्मापेक्षां धर्म फार; शैव्यमध्वलिंगधर्ते सर्वहि स्वमताभिमानित; शौर्यधर्माविषयीं नायमाराव्यतिरिक्त सर्वहि युक्तियोद्धे ; हें सर्व तुह्मांसहवर्तमान पाहावें उचित असतां, अनेक शोभा टाकून, एक स्वलग्नशोभा अंगीकरून गेलां, हें उत्तम न केलें !!! पुढेंतरी स्वकीयागमनेंकरून या प्रांताचे अवलोकन करणें उचित असे तुह्मांसहवर्तमान इकडे येणें झालिया उर्वरित श्रृंगारसाधनें प्रयत्नपूर्वक पाहण्यांत यईल. राजकार्यप्रसंगविचार करितां भगीरथसमान कैलासवासियांनी उत्तरेहून दक्षणपावेतों सुवर्णनदीप्रवाह चोवीस वर्षे वाहविला. त्यांचे आशीर्वादें अलीकडेही निरंतर वर्धमान वाहात असतां, देशाधिकारी व सेनामुख्य व अकृत्रिमास पूर्ण त्या नदीनें संतुष्ट केलें. एक तृष्णा मात्र त्या सुवर्णवोघानें वर्धमान केली. दक्षण देशांतून सुवर्णनदी मागे रघोजी, फत्तेसिंगबावांनी आणिली. परंतु जागां जागां जिरली. मध्यें बहुत दिवस दक्षिण नदी न वाहिली. श्रीइच्छेनें या वर्षीही कालानरूप द्रव्य नदी उत्तमच या सैन्यांत आहे. परंतु पुण्याकडे जातां रुक्ष देश फार आहे याजमुळें सर्व जिरून जाईल. एकदां उत्तरेकडील सुवर्ण नदी व दक्षणेची नदी दोहींचा संगम सगरकूपसमान पुणें या स्थळीं, मध्यें न जिरतां, पूरयुक्त योग घडणें तेव्हां ऋणोद्धार श्रमसार्थक इहलोक परलोकीं उत्तम होईल. भागीरथी सगरासाठीं उत्पन्न; परंतु विश्वातें उद्धार करिते. तशी या काळीं हे उत्तरदक्षण नदी वाहते, बहुत जनांस उपकारक होते. सर्वही नद्या जलौघें समुद्रास जातात. एक कावेरी मात्र बहुत लोकांनी आपले उपयोगास आणिली. तशी हे द्रव्यनदी मुख्य कार्य थोडें व गौणजनकार्य मात्र बहुत करिते. हा न्याय अन्याय, हा विचार साक्षी दृष्टीवंत असतील त्यांनी विचारून, पुण्यांतील रुक्षता दूर होय, व मध्यें कार्याकारण जिरे, ऐसें करणें, हें योग्य असे. रा॥ छ. ९ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.