[ १५७ ]
श्री. शके १६६४ मार्गशीर्ष वद्य १४.
पै॥ छ ११ जिल्हेज.
श्रियासह चिरंजीव दामोधरजीस. प्रति बापूजी महादेव हिंगणे मु॥ प्रांत अहिरवाडा आशिर्वाद उपरि. येथे गां। भा। भीऊबाई चिंचोलीकर नाशकीपुर्यामध्यें राहतात. यांहीं येथें आह्मांपासीं दिल्हे नगद रुपये १७५ अंके पाउणे दोनशें, याचे निमे ८७॥ साडे सत्यांसी याचे दुणे करून लिहिलेप्रों। पावणेंदोनसें देणें. पावलियाचें कबज घेणें. हा कागद घेऊन उत्तम रुपये देणें. अनमान न करणें. हा आशीर्वाद. मिति मार्गेश्वर वद्य १४ सके १६६४ दुंदुभीनाम संवत्सरे. वळी अकरा.