[ १५६ ]
श्री. शके १६६४ कार्तिक शुद्ध ३.
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री बापूजी महादेव गोसांवी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार. सु॥ सलास अर्बैन मया अलफ. संवस्थान बुंदी येथील मख्ता साल गु॥प्रमाणें सालमजकुरीं रुपये ५०,००० पन्नासहजार करार केले आहेत. त्यास, या ऐवजावरी तुह्मांपासून घेतली रसद रुपये ३८,००० अडतीस हजार घेतले. यास व्याज दरमाहे दर सदे रुपये १॥ दीढप्रमाणें. सदरहू रसदेचे रुपये सरकारांत जे मितीस पावतील ते मितीची कबजें घेऊन सवस्थान मजकूरचे ऐवजी मुद्दल रुपये व व्याज उगवून घेणें. जाणिजे. छ. २ रमजान.
लेखन
सीमा.