[ १५४ ]
पौ छ. १६ सफर. श्री. शके १६६४ वैशाख शुद्ध ११.
तीर्थरूप राजश्री नाना स्वामीचे सेवेशीः--
अपत्ये सदोबानें साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ. १० सफर मुकाम ठाणें, सुपें, प्रांत सोंधे, पर्यंत वडिलांचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं च्यार प्रतीनें पत्रें पाठविलीं तीं एका मागें एक पावलीं. लिहिला मजकुर कळला. त्यांची उत्तरें अलाहिदा पुरवण्यांत लिहिलीं असेत. त्याजवरून कळेल. चिरंजीव राजश्री रघुनाथ यांस * लग्नास पाठविलें. श्रीकृपें लग्नसिद्धी करून आलेच असतील. वर्तमान लिहिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.