[ १५३ ]
श्री. बापाजी. शके १६६४ चैत्र शुद्ध ७.
पुरवणी राजश्री मानाजी आंगरे वजारत माब गोसावी यांसीः-
विनंति उपरि. राजश्री तुळाजी आंगरे यांजकडील कारभारी तेथें येऊन, धातुपोषण बोलोन मनसुभा उपस्थित केला आहे. राजश्री यमाजीपंत यांणी मनावर घेतलें आहे. पद त्यास देणार. तरी हे गोष्ट होऊं दिल्यानें आपणांस आमचा शब्द लागतो. राजश्री स्वामी अंजनवेलीचे मसलती जो करील त्यांस देणार. तरी आधीं धणी यांचे कार्य करावे. व त्यांचे वस्तु झालेसें झालें तरी मग त्याकडे दिल्यानें आह्मांस असंतोष नाहीं. ह्मणोन कितेक बिशदे दोनचार वेळा लिहिलें. व राजश्री शिवरामजी यांस लिहून पाठविलें. त्यांणीही आपली पत्रें दाखविलीं, त्यांजवरून कळों आलें. ऐसियास, तुह्मी त्यांस वडील परंपरा पाहतां, वडिलांकडे पद असावें. हे गोष्ट यथार्थच, परंतु मनसुब्यामुळें तिकडील संदर्भ झाला होता. त्यांस राजश्री स्वामीसंन्निध कितीएक रीतीनें समजावयाचें तें समजाविलें, व शिवरामजी यांजपासूनही अर्ज करविला. तुळाजी आंगरें याचाही मनसुबा धातुपोषणसा दिसोन आला. ऐशा तिन्ही गोष्टींचे साहित्य पडोन तिकडील विचार राहिला. त्यांस, राजश्री स्वामीचें चित्तीं अंजनवेलीचा मनसुबा करणें अगत्य. तुह्मांकडील साहित्य सांप्रतच येईल, किंवा कसे काय ? हेंही पुसत होतें. त्यास, दूरप्रांत, दिवस अखेरीचे, यासमयीं कैसे होईल, हें जाणोन पर्जन्य झाल्या उपरी भाद्रपदमासीं करावें ऐसा सिध्दांत झाला आहे. त्यास, आपणांस येऊन कार्यभाग सिद्धीस पावावयाचा विचार होत असेल, तरी तैसेंच विचार करोन लिहोन पाठवावे. त्यासारिखी अगोदर पैरवी करावी लागेल. जो हें कार्य करील त्यास पद देणार. श्रावण मासानंतर राजश्री यमाजीपंत उतरणार. त्यासमयांत मार्ग काढिला पाहिजे. तुळाजी आंग्रे यांणीं अरगजलें तरी पाहिलें हालीप्रमाणें तिकडेस वतन देतील, तेव्हां, तुह्मी
आह्मांवरि शब्द आणाल, यास्तव लिहिलें आहे. आपला पुरता विचार करून उत्तर पाठविणें. जातसाल खेळवणें. येविसीची आज्ञा राजश्री स्वामींनीं राजश्री शिवरामजी यांजवळही केली आहे. हे सांगतील त्याजवरोन कळों येईल. रा॥ छ. ५ सफर. बहुत काय लिहिणें ! लोभ असो दीजे. हे विनंति.