[ १४६ ]
श्री. शके १६६२ भाद्रपद शुद्ध ९.
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री माहादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसि :---
सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार. सु॥ ईहिदे अर्बैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. जयनगरीहून स्वार होऊन नाशिकास आलों. हत्ती समागमें आहे. दरमजलीमुळें तलाक आहे, यास्तव सोप करविलें असेल. आपलें आगमन सातारियाहून पुण्यास जाहालियाची आज्ञा जाहालिया दर्शनास येऊं, ह्मणून लि॥ तें कळलें. नाशिकास आलेस हत्तीस सोप केले, उत्तम केलें. आह्मी पुण्यास आलों. अतःपर तुह्मी स्वार होऊन येणें. जाणिजे. छ० ८ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.
पौ छ. १३ जमादिलाखर.