[ १४५ ]
श्री. शके १६६२ आषाढ वद्य ९.
वो रजिश्री महादेवभट्ट हिंगणे गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणवून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. आपण पत्रें पाठविली तें पावोन भावगर्भ ध्यानास आला. दिल्लीकडील मजकूर लिहिला कीं, निजामांनी बहुतसा उपद्वाप मांडून अजिमुलाखानास माळव्याची सुभेदारी सांगून, वस्त्रें देऊन, रवाना केले आहेत. बरोबरी फौज पंधरा हजार कुली बिसाद आहे. डेरियासी दाखल जालें. पुढें चालणार. असे कितेका प्रकारें सविस्तरें अर्थ लिहिला तो कळूं आला. ऐश्यास पूर्वी जे जे आले त्यांनीं पराक्रम केला तो तुह्मास दखलच आहे ! ज्यांनी इतका उपद्वाप केला, त्यांनी पराक्रम केला तोही तुह्मांस पूर्ण श्रुत आहे आणि देखिलेंही आहे ! प्रस्तुत अजिमुल्लाखान येणार ! त्यास माळव्याप्रांतीं छावणी असती तरी या दिवसांत ते नांव इकडे यावयाचे न घेते ! तथापि 'आह्मी देशास आलों ह्मणून काय जालें ? याउपरि सेनासहवर्तमान त्या प्रांतास सत्वरीच येऊन. अविंधास बरे वजेनें नतीजा पाविला जाईल. आणि कोणी लबाडी करतील तेही आपल्या गुणेंच फजित पावतील ! चिंता काय आहे ? श्रीमंत राजश्री नानास्वामीस पेशवईची वस्त्रें अषाढ शुध द्वादशीस जालीं. श्रीमंत राजश्री आपास्वामी व ते ऐसे उभयतां सातारियांतच आहेत. तेथून सत्वरच पुणियासी येतील. कळलें पाहिजे. रा। छ. २२ रबिलाखर. बहुस काय लिहिणें ? हे * विनंति.
मोर्तब
सूद.
सो। गंगाधर यशवंत व रामाजी यादव सा। नमस्कार विनंति उपर लि॥ परिसिजे. लोभ असो दीजे. हे विनंति.
श्री ह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी होळ
कर.