[ १४४ ]
श्री. शके १६६२ वैशाख वद्य ११.
अखंडितलक्ष्मिअलंकृतराजमान्य राजश्री माहादेवभट्ट गोसावी यासिः--
सेवक जनार्दन बाजीराऊ नमस्कार सु॥, अर्बैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें छ० २३ सफरीं प्रविष्ट जाहालें. पत्रापूर्वीच तीर्थस्वरूप राजश्री रायांनी कैलासवास केला, हें वर्तमान तुह्मांस लिहून पाठविलें आहे, त्यावरून कळलेंच असेल. सांप्रत तुमचें पत्र आलें, त्यांत कितेक राजकारणाचा मजकूर लिहिला होता. ऐसियास, तीर्थस्वरूप कैलासवास राउयांचा प्रताप तैसाच होता. जो मनसबा सिधीस न जावयाचा तोही त्याचे पुण्येंकरून सिधीस जात होता. असो ! श्रीइच्छेनें प्रस्तुत प्रसंग ऐसा होऊन आला ! परंतु कैलासवासी यांणीं समागमें काय नेलें ? सर्व प्रसंग यथास्थित आहे. दिल्लीकडील राजकारण राजश्री बाबूराव यांचे विद्यमानें जाहालें आहे, तें राजश्री लवाइजी यांणीं रक्षिल्यास चातुर्मासानंतर उभयपक्षींच्या उपयोगाचें आहे. राजश्री राजराजेंद्र यांचा व राजश्री राव कैलासवासी यांचा स्नेह व एकात्मता होती, तेणेंकरून बहुतांस दबाव होता. प्रस्तुत, राव कैलासवासी जाहाले याजमुळें राजराजेंद्र दुश्चित्त होऊन पूर्वील अनुसंधान सोडितील तरी कार्याचें नाहीं. काय निमित्य कीं, नकारनामकाच्या चित्तीं सारी पातशाही आक्रमांत आणावी. त्यास, आधी हर्षामर्ष वाढवितां, राजराजेंद्र यासी वाढवितील. यास्तव पहि *
रसीदगि छ० १ १ रविलावल