[ १४१ ]
श्री.
पौ छ. २४ रजब.
शके १६६१ आश्विन शु॥ १३.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर
खंडोजीसुत मल्हारजी
होळकर.
राजश्री बापूजी माहादेव व राजश्री दामोदर माहादेव गोसावी यांसिः----
छ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। मलारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अर्थ विदित जाला. नवाब मनसुरअलीखान यांजला वजिरीची वस्त्रें व सादतखान यांजला बकशीगिरीचीं वस्त्रें जालीं; आणखी कितेक दुराणियाकडील वगैरे वर्तमान लिहिलें तें अक्षरशाहा ध्यानास आलें, पूर्वी मुजरद कासीदजोडिया पाठविल्या त्याचें उत्तर न आलें. सांप्रत पत्र पावून वृत्तांत कळूं आला. ऐसेंच वरचेवर तेथील अमिराचे व पठाणाकडील सविस्तरें लिहून पाठवित जाणें. अळस न करणें. इकडील वर्तमान तरी:- ईश्वरसिंग याची बुद्धि क्षणभंगुर, निखालसता नाहीं, आह्मांस तो कार्य करून घेणें. त्यासी तूर्त +++ गीचा मुकाम आहे. तेरा कोस +++ येथून तेहि फौजाची तयारी करितात. बाहेर निघालिया खावंदाचे प्रतापेंकरून त्याचे मनोरथ भग्न करून आपलें कार्य करून घेतलें जाईल. चिंता नाहीं. तुह्मीं तेथल्या खबरीस पाठवायाचा आळस न करणें. श्रीमंत राजश्री पंतप्रधानस्वामी माळवे प्रांते जाऊन धारेपासी मुकाम जाले. त्यासी, राजश्री यशवंतराव पंवार येऊन धार, सोनगड़ दोनी स्थळें श्रीमंत स्वामींकड़े देऊन कृपा संपादन करून घेतली. धार, सोनगड येथील बंदोबस्त करून श्रीमंत देशास गेले; ऐसें वर्तमान आलें आहे. राजश्री जयाजी सिंदे व र॥ रामचंद्रबावा उजिनीस छावणीस राहिले, ऐसें वर्तमान आहे. तत्वतां पत्र आलिया लिहून पाठवून. दिल्लींतील सार्वभोमांचें व सामादिकांचे वर्तमान मनसबा ल्याहावयासी अंतर केलें न पाहिजे. आह्मीहि येथें उपराळियांसी आहों. ++ उत्तर पाठवीत जाणें. छ. १० रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तब सुद.)