[ १२९ ]
श्री. शके १६६० पौष शु॥ १५.
राजश्री पिलाजी जाधवराऊ गोसावी यांसिः-
॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। बसवंतराऊ खासखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस आपणांकडील पत्र येऊन कुशलवृत्त कळत नाही. तरी ऐसें न केलें पाहिजे. सदैव पत्रद्वारें संतोषवित गेलें पाहिजे. यानंतरः तुह्माकारणें संक्रमणप्रयुक्ततीळशर्करोथैली पाठविली आहे. घेऊन उत्तर पाठविलें पाहिजे. जाणिजे. छ. १३ माहे सवाल. हे विनंति.
मोर्तब
सुद.
ॅ श्री ०
राजा शाहू चरणीं
तत्पर बसवंत से-
वा निरंतर.