[ १२६ ]
श्री. शके १६६० आश्विन शु॥ १.
राजश्री महादेभट हिंगणे गोसावी यांसिः-
स्नो उदाजी पंवार दंडवत विनंति. सु॥ तिसा सलासीन मया व अलफ. तुह्मांकडील ऐवजापैकी उदाजी खीरसागर यास बद्दल मुशाहिरा रुपये ३५० साडेतीनशें देविले आहेत. देऊन पावलियाचें कबज घेणें. जाणिजे. छ० २९ जमादिलाखर. तुह्मांकडे हुंडीबा। सरकारचा ऐवज येणें. त्याऐवजीं सदरहू रुपये देऊन पावलियाचें कबज गेणें. तेणेंप्रों। मजुरा असेत. हे विनंति.
बार.
मोर्तब
सुद.
श्रीशिवचरणी दृढ
भाव रंभाजी सुत
उदाजी पंवार