[ १२४ ]
श्री. शके १६६० आश्विन शुद्ध १.
राजश्री महादेभट हिंगणे गोसावी यांसिः-
स्ना। उदाजी पंवार दंडवत. सु॥ तिसा सलासीन मया व अलफ. तुह्मांकडील ऐवजपैकीं राजश्री जगनाथराम यास रदकर्जाबद्दल रु॥ २०० दोनसे देविले असेत. देऊन पावलियाचें कबज घेणें. जाणिजे. छ० २९ जमादिलाखर. + तुह्मांकडे सरकारचा ऐवज येणें. त्याऐवजीं सदरहू रु॥ देविले असेत. देऊन पावलियाचें कबज घेणें. तेणें मजुरा असेत. हे विनंति.
मोर्तब
सुद.
श्रीशिवचरणी
दृढ भाव रंभाजी
सुत उदाजी बार
पंवार