[ १२० ]
श्री.
शके १६६० ज्येष्ठ वा। ८.
राजश्री गंगाजी नाईकः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. खासास्वारी वसईस व्हावी असें होतें. परंतु जरूर प्रयोजन लागलें, एतन्निमित्य पुण्यास जाणें जालें. तेथें राजश्री शंकराजी केशव आहेत, त्यांजपाशीं तुह्मीं आहां. मारनिलेंनीं ज्यास जेथें ठेविलें त्या जागा राखून श्रमसाहास केलेंत. तें सकळ वर्तनान मा।रनिलेच्या पत्रावरून विदित होऊन संतोष जाहाला. प्रहस्तुत, हें पत्र सादर केलें असे. तरी मशानिले सांगतील त्याप्रमाणें अंगेजणी करून जागा मजबूद होई तें करणें. तुह्मीं इतबारी, कामाचे भरंवशीयाचे लोक आहां. जागा मजबूद करून नक्षा करणें ह्मणोन तुमचे नोकरीचा मजुरा होऊन ऊर्जित केलें जाईल. तिकडील मनसुबा तुह्मां लोकांवरी आहे. त्याची शरम धरून मारिनिलेच्या हुकुमाप्रमाणें वर्तणुक करणें. जाणिजे. छ. २० सफर.
आज्ञा प्रमाण.
लेखन
सीमा.
० श्री. ॅ
राजा शाहू नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बल्ला-
ळ प्रधान.