[ ११७ ]
श्री. शके १६५९ पौष शुद्ध १०.
तीर्थरूप राजश्री बाबा वडिलाचे सेवेसी :-
छ. ४ रमजानी पंतप्रधानासी व नवाबासी लढाई जाहाली. हत्तीपाखेड पा। दुराबा येथून नवाबानें कुच करून बारा कोसाचें. तो ेप्रधानांनीं प्रातःकाळापासून भांडत भांडत, नवकोस मजल . तीन कोस जेथें राहिली तेथें बनसिंग जाट व दोस्त महमदाचा लेक व जैसिंगाचा लेक. ऐशियास, आघाडीस मल्हारजी व राणोजी शिंदे व पिलाजी जाधव. ऐशियास, बरीच लढाई जाहाली. त्यास, ऐशी जाहाली कीं, तोफखाना फोडून निमचाची लढाई जाहाली. होळकर याजकडील लोक-तीनशे माणसें, दोघे सरदार, कांही जखमी, वरकड शांत-मेले. ऐसे संध्याकाळचा दोन घटका दिवस राहात तोपरियंत जाहाली. त्यास, दोघेही काइम राहिले. मग होळकरांकडील व पंतप्रधान नवाबाच्या लष्करापासून दोन कोसांवरील मुकाम केला आहे. छ. ५ तेरिखेस नवाबांनीं भुपाळगडास दाखल जाहाले. मार्गी भांडत भांडत भुपाळगडास दाखल जाहले. वीस वीस कोस जिकडे नवाब जातो तिकडे धान्यास अग्निप्रवेश होतो. याप्रकारचें वर्तमान आहे, तहकीक. छ. ६ रमजानीं भुपाळगडाहून अलीकडे होते तेहि भांडतच. ऐसे वर्तमान आहे. आलें वर्तमान सेवेसी लिहिलें असे. तीर्थरूप राजश्री आपाचें वर्तमान तरी, छ. २६ शाबानचें पत्रच आले होते. आलीकडे हा कालपरियंत आलें नाही. विदित होय. हे विज्ञापना. छ. ८ रमजान. प्रहर दिवस.
सासवडीं आलें पत्र छ. २६ रमजान.