[ ११६ ]
श्री. शके १६५९ मागशीर्ष वद्य ३०.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजी-
राव बल्लाळ
प्रधान.
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ता। मोकदम मौजे माढवें पा। वरणगांव सु॥ समान सलासीन मया अलफ. तुमचें हुजुर प्रयोजन आहे. तरी देखत आज्ञापत्र हुजुर येणें. या कामास स्वार पागा पाठविले असेत. यासी मसला रुपये ५ पांच देविले असेत. आदा करणें. जाणिजे. छ. २८ साबान. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा.