[ ८४ ]
श्री. शके १६५४.
राजश्री सुभेदार गोसावी यांसि :-
अखंडितलक्ष्मिअलंकृत राजमान्य.
स्नो। विसाजी दादाजी आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करावयाची आज्ञा केली पाहिजे. विशेष. रा। गोविंद बल्लाळ यांजविशीं, आपण येथें आले होते तेव्हां, श्रीमत् राजश्री आपांस विनंति केली होती. त्याप्रमाणें हल्ली त्यास पुसोन आपल्या नांवें सनद लेहून पाठविलीं आहे. त्याप्रमाणें आपण त्याचे विल्हेस लाविलें पाहिजे. वरकड रा। बाळजी मा।रनिल्हेकडून आले आहेत. हे सांगतील त्यावरून विदित होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.
राजश्री बाबुराऊजी स्वामींस सा। नमस्कार. लि॥ परिसीजे. रा। बाळजीची रवानगी लौकर केली पाहिजे. हे विनंति.