[ ८२ ]
श्री. शके १६५४ भाद्रपद वद्य १०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री कृष्णराउ महादेउ
स्वामी गोसावी यांसिः-
पोष्य बाजीराउ बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. प्रांत जवार, रामनगर, व पेठ वासवे, किल्ले कोहज. हा मामला तुमचे स्वाधीन केला आहे. त्यापैकीं राजश्री पिलाजी जाधवराउ यांसी रुपये १,७०० सतरासे पावत असतात. तेणेंप्रमाणें सतरासे रुपये तुह्मांकडून मा। ३,४०० पैकीं सदरहू सतरासे रुपये देविले असेत. मा।रनिल्हे ( स ) पावते करणे. जाणिजे. छ० २२ रबिलोवल बहुत काय लिहिणें ? + हे विनंति.
बार.