[ ८१ ]
श्री. शके १६५४ भाद्रपद शुद्ध ६.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति
हर्षनिधान बाजीराव
बल्लाळ प्रधान.
मा। अनाम देशमुख व देशपांडे का। सासवड यांसिः-
बाजीराउ बल्लाळ प्रधान. सा। सलास सलासीन मया अलफ. मौजे कारखेल का। मजकूर व मौजे देऊळगांव पा। सुपे या हरदू गांवचे शिवेचा कजिया आहे. तोबर हक्क गोतमुखें निवडावयाविशीं राजश्री त्रिंबक हरी सुभेदार पा। सुपें यांस आज्ञा केली आहे. तरी तुह्मी भवरगांवचे गोत जमा करून, कोणाची भीड मुरवत न धरितां, रास्ती इनसाफ करणें. जरी कोणाची भीड धरून इनसाफ कराल, तर तुमचा मुलाहिजा होणार नाही. हें पष्ट समजून वर्तणूक करणें. तुह्मीं गोत घेऊन मारनिलेकडे जाणें. जाणिजे. छ० ४ रबिलोवल. पा। हुजूर.
लेखन
सीमा