[ ७९ ]
श्री. शके १६५४ वैशाख शु॥ १.
राजश्री बाजीराव पंडित प्रधान गोसावी यांसिः--
७ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
प्रीतिपूर्वक उमाबाई दाभाडे दंडवत विनंति उपार येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. चिरंजीव राजश्री बळवंतसिंग विश्वासराव टोके यांस तुह्मीं पत्र लिहिलें, त्याजवरून वर्तमान अवगत जालें. ऐसियास, आपण कोण्हाच्या सांगितल्यावरून गोष्टी लेहावी एसें नाहीं. उंटाचा विचार आह्मी मनास आणिला. तो रातची उंटें सुटून चांदोरीच्यामागें लश्करापासून दोंकोसांवर गेली. तिकडून यांचे राउत यांचे समागमें माणसे पाठवितां उंटें लश्करांत ( परत आली. ) + + रोज होतीं. कोणाचा बोभाट न आला. याजकरितां गांवास पाठविलीं. सांप्रत, तुमच्या पत्रावरून उंटें त्यांच्या स्वाधीन केली. आपणांस कळावें याजकरितां लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. छ० १९ माहे जिल्काद. हे विनंति.