[ ७१ ]
श्रीगणपतिर्जयति.
श्रीमंत राजश्री महादाजीपंत स्वामीचे शेवेसीः--
पोष्य * गोविंद हरी कृतानेक सा। नमस्कार विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. नांदूरचे बैल चोरांनी नेले, सबब, पारगांवचे बेरड आणविले होते. त्यांस, पारगांवीहून रा। धोंडो नारायण कमाविसदार यांचे पत्र आले ते व बेरड दोघे आले. ते शेवेसी पाठविले आहेत. यांचा इनसाफ कर्तव्य असेल तो केला पाहिजे. + बहुत काय लिहिणें ! लोभ असो दीजे. हे विनंति.