[ ६९ ]
श्री.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बापूजीपंत स्वामी गोसावी यांसीः--
पोप्य अंबाजी त्रिंबक कृतानेक साष्टांग नमरकार विनंत उपरि येथील कुशल ता। छ १८ सवाल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. मौजे दियें का। सासवड या गांवावरी हंगामशीर प्रजिन्य पडिला नाही. यामुळें पीक जालें नाहीं. आणिक कितेक तगादे किरकोळ उपसर्ग जाला. यामुळें गांवीची रयत परांगदा जाली आहे. त्यास तूर्त दिलासा करून गांवावरी आणून कष्टमशागत करविली पाहिजे. याकरितां स्वामींनी तूर्त गांवीची खंडणी दोन मास रुजू करूं नये. रयतीस अभयपत्र देऊन गांवावरी आणून कीर्द करावयास लावून गांवीची अबादानी केली पाहिजे. येविशीं अनमान केला न पाहिजे. कृपालोभ असो. हीच विनंति.